Join us

JIO धमाका ! 28 फेब्रुवारीला करणार मोठी घोषणा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 06:41 IST

28 फेब्रुवारीला दुपारी 1.15 च्या सुमारास रिलायन्स जिओचे प्रेसिडेंट ज्योतिंद्र ठक्कर पत्रकार परिषद

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - भारतातील टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंग 'मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस'मध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. स्पेनच्या बार्सिलोनामध्ये 26 फेब्रुवारीपासून मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसला सुरूवात होणार आहे.  28 फेब्रुवारीला दुपारी 1.15 च्या सुमारास सॅमसंगचे नेटवर्क बिजनेस प्रेसिडेंट यूंग्की किम आणि रिलायन्स जिओचे प्रेसिडेंट ज्योतिंद्र ठक्कर हे संयुक्त पत्रकार परिषद घेतील.  
 
यावेळी  रिलायन्स जिओ आणि सॅमसंग मोठी घोषणा करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय, या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय बाजारात पाऊल टाकण्याची घोषणा जिओकडून केली जाण्याची चर्चा आहे. या कार्यक्रमासाठी कंपनीकडून प्रसार माध्यमांना आमंत्रण देण्यात आलं आहे.  ''या कार्यक्रमात उपस्थित असणा-यांना, भविष्यात आम्ही इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय स्थरावर कसा प्रभाव टाकू हे सांगू'' असं आमंत्रण पत्रिकेत म्हटलं आहे.  
 
त्यामुळे जिओ आंतरराष्ट्रीय बाजारात उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय जिओ सॅमसंगसोबत काही मोठे करार करणार आहे त्याचा भारतात आणि भारताबाहेर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.