Join us  

Jio Effect: बीएसएनएलने आणला ग्राहकांसाठी नवा प्लॅन, 298 रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि डाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2017 8:25 PM

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनेक दूरसंचार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येताना दिसत आहेत. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. 

मुंबई, दि. 01- रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनेक दूरसंचार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येताना दिसत आहेत. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन आणला आहे. हा प्लॅन 298 रुपयांचा असून जिओच्या 309 आणि एअरटेलच्या 399 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देणार आहे. बीएसएनएलच्या 298 रुपयांच्या या नव्या प्लॅनमध्ये ग्राहकाला अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग करता येणार आहे. तसेच, 56 दिवसांसाठी डाटा मिळणार आहे. याचबरोबर,  प्लॅनमध्ये 1 जीबी FUP लिमिटसह डाटा मिळणार आहे. 1 जीबी डाटा संपल्यानंतरही ग्राहक इंटरनेट अॅक्सेस करु शकतात. मात्र, त्याचा स्पीड लिमिट कमी असणार आहे. या प्लॅनची वैधता 56 दिवसांसाठी असणार आहे. दरम्यान, बीएसएनएलने आणलेला हा एक प्रमोशनल प्लॅन आहे. त्यामुळे ग्राहकांना 180 दिवसांसाठी म्हणजेच 7 ऑगस्ट ते 4 नोव्हेंबरदरम्यान हा प्लॅन घेता येणार आहे.गेल्या रक्षाबंधन सणानिमित्त बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी खास प्लॅन आणला होता.  'राखी पे सौगात' असे या प्लॅनचे नाव होते. तसेच, हा प्लॅन 74 रुपयांचा असल्याने यामध्ये अनलिमिडेट कॉलिंग आणि 1 जीबी डाटा देण्यात आला होता. 'राखी पे सौगात' हा प्लॅन 3 ऑगस्ट लॉन्च करण्यात आला होता. 

टॅग्स :मोबाइल