Join us

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केले ‘हे’ दोन स्वस्त प्रीपेड प्लॅन 

By सिद्धेश जाधव | Updated: September 8, 2021 18:07 IST

Reliance Jio ने यावर्षी जूनमध्ये सादर केलेले 39 आणि 69 रुपयांचे रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. हे दोन प्लॅन्स बंद करण्यात आल्यामुळे आता जियोफोन ग्राहकांना 75 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनने रिचार्ज करावा लागेल.

ठळक मुद्दे Reliance Jio ने यावर्षी जूनमध्ये सादर केलेले 39 आणि 69 रुपयांचे रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. 69 रुपयांच्या जियोफोन प्लॅनमध्ये ग्राहकांना 14 दिवसांच्या वैधतेसह रोज 500MB डेटा दिला जात होता.

Reliance Jio ने आपले दोन स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणि एक ऑफर बंद केली आहे. कंपनीने यावर्षी जूनमध्ये सादर केलेले 39 आणि 69 रुपयांचे रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. जियोफोनसाठी सादर करण्यात आलेले हे दोन्ही रिचार्ज प्लॅनची लिस्टिंग कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर काढून टाकण्यात आली आहे. तसेच कंपनीने जियोफोनच्या रिचार्ज प्लॅन्सवरील ‘बाय 1 गेट 1 फ्री’ ऑफर देखील बंद केली आहे.  

JioPhone चा 39 रुपयांचा प्लॅन 

हा प्लॅन जियोफोनचा सर्वात स्वस्त प्लॅन होता. यात ग्राहकांना 14 दिवसांच्या वैधतेसह रोज 100MB डेटा दिला जात होता. तसेच प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस दिले जात होते. तसेच जियो अ‍ॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन देखील मिळत होते.  

JioPhone चा 69 रुपयांचा प्लॅन 

69 रुपयांचा प्लॅनमधील फायदे 39 रुपयांच्या प्लॅन सारखेच होते. फक्त या प्लॅनमध्ये मिळणार डेटा जास्त होता. 69 रुपयांच्या जियोफोन प्लॅनमध्ये ग्राहकांना 14 दिवसांच्या वैधतेसह रोज 500MB डेटा दिला जात होता. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळत होती. तसेच जियो अ‍ॅप्सच्या मोफत सब्सक्रिप्शनची जोड देखील देण्यात आली होती.  

हे दोन प्लॅन्स बंद करण्यात आल्यामुळे आता जियोफोन ग्राहकांना 75 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनने रिचार्ज करावा लागेल. ज्यात 39 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स मिळतील. फक्त या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.  

 

 

 

टॅग्स :जिओ