Join us
Daily Top 2Weekly Top 5

दागिन्यांची निर्यात ७.५ टक्के घटली

By admin | Updated: November 30, 2015 00:52 IST

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत भारताच्या रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत ७.५ टक्के घट झाली आहे.

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत भारताच्या रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत ७.५ टक्के घट झाली आहे. सोन्याची किंमत आणि जागतिक पातळीवरील मागणीत झालेली घट यामुळे निर्यातीला फटका बसला आहे. रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेकडील आकडेवारीनुसार, २0१४ च्या पहिल्या सहामाहीत २२.१५ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. ती यंदा १८.0९ अब्ज डॉलरवर आली आहे. निर्यातदारांची शिखर संस्था फियोने म्हटले की, सोन्याच्या भावातील घसरण आणि जागतिक बाजारातील नरमाई यामुळे निर्यातीत घट झाली आहे. याशिवाय भारतातून पाठविण्यात येणाऱ्या खेपा रद्द करण्याचे प्रमाणही मोठे आहे. या उद्योगातील लोकांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. या क्षेत्रात चीन आपला सर्वांत मोठा प्रतिस्पर्धी आहे. आॅक्टोबर महिन्यात रत्ने आणि दागिन्यांची निर्यात तब्बल १३ टक्क्यांनी घसरून ३.४८ अब्ज डॉलरवर आली. सोन्याच्या आयात शुल्कात कपात करण्याची मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)