Join us

जीएसटीसंबंधी अडचणी जेटली यांच्याकडे मांडणार

By admin | Updated: June 9, 2017 00:01 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे तसेच जीएसटी परिषदेमध्ये निश्चित मांडू, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जीएसटी करप्रणालीत व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याच्या तक्रारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे तसेच जीएसटी परिषदेमध्ये निश्चित मांडू, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. या वेळी राज्याचे मुख्य विक्री कर आयुक्त राजीव जलोटा हेही उपस्थित होते.राज्यातील व्यापारी व उद्योजकांच्या कॅमिट संघटनेच्या वतीने चेअरमन मोहन गुरनानी, अध्यक्ष दीपेन अगरवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अर्थमंत्र्यांची भेट घेतली आणि व्यापाऱ्यांचे तसेच छोट्या व मध्यम उद्योजकांचे जीएसटीसंबंधातील प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. कॅमिट या केंद्रीय संघटनेत राज्यातील २७ महापालिकांतील व्यापारी आणि उद्योजकांच्या संघटनांचा समावेश आहे. त्यांच्या काही तक्रारी कराविषयी तर काही अडचणी विवरणपत्रे भरण्याविषयी होत्या. जवळपास प्रत्येक उद्योग आणि व्यापारातील प्रत्येक क्षेत्र यांच्या संघटनांचे प्रतिनिधी या शिष्टमंडळात होते.