Join us

जेजुरीच्या र्मदानी दसर्‍याला प्रारंभ

By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी येथील जगप्रसिद्ध र्मदानी दसरा सोहळ्याला शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवाचा पालखी सोहळा, देवाचा जयघोष करत आणि भंडारा-खोबर्‍याच्या उधळणीत सीमोल्लंघनासाठी गडकोटाबाहेर पडला.

सकाळी धार्मिक विधी पूर्ण करत जेजुरी गडावरील बालदारीतील देवाचे घट उठवण्यात आले. मुख्य मंदिरात महापूजा, अभिषेक, गड पूजनाबरोबरच तलवार व ध्वज पूजन विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता देवाचे मुख्य मानकरी राजेंद्र पेशवे व शामकाका पेशवे यांनी आदेश देवून सोहळ्याला प्रारंभ झाला. देवसंस्थानतर्फे बंदुकीच्या फैरींची सलामी देण्यात आली.
उत्सव मूर्तींना पालखीत ठेवताच संपूर्ण गड कोट देवाच्या जयघोषाने दणाणून गेला. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’च्या गजरात भाविकांनी भंडार खोबर्‍याची उधळण केली. निशाण, आबदागिरी, चौघडा आणि सनईच्या सुरात सोहळ्याने मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून गडकोटाबाहेर सीमोल्लंघणासाठी प्रस्थान ठेवले. रात्री 9 वाजता कडेपठार मंदिरातील देवाचा पालखी सोहळ्याने सुद्धा देव भेटीसाठी कूच केले. (प्रतिनिधी)
-----------------