प्रवाशांवरून जीपचालकांत धुमश्चक्री
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
डोळखांब बंद : धुलीवंदनाला गालबोट
प्रवाशांवरून जीपचालकांत धुमश्चक्री
डोळखांब बंद : धुलीवंदनाला गालबोट शहापूर : तालुक्यातील डोळखांब येथे शहापूर ते डोळखांब प्रवासी वाहतूक करणार्या खाजगी जीप चालकांमध्ये ग्राहक मिळविण्यावरु न लाठ्याकाठ्या, लोखंडी सळ्यांनी जोरदार हाणामारी झाली. यात महेश ठाकर हा जीपचालक गंभीर जखमी झाला. त्याला शहापूर येथील रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणातील महेश रामचंद्र वारघडे, रामचंद्र मालू वारघडे या दोघांना किन्हवली पोलिसांनी अटक केली असून हरिश्चंद्र वारघडे, संजय वारघडे, शरद वारघडे, संदीप वारघडे यांच्यासह अन्य ३ जण पसार झाले आहेत. या धुमश्चक्र ीने शहरात तणाव पसरला आहे. खासगी जीपने प्रवासी वाहतूक करणार्या चालकांमध्ये नेहमीच वाद आणि मारामार्या होतात. याला कंटाळून निषेध नोंदविण्यासाठी शुक्र वारी ऐन धुलीवंदनाच्या दिवशी व्यापारी, रहिवाशांनी शहरात कडकडीत बंद पाळला. अवैध खासगी वाहतुकीला किन्हवली पोलीस हप्तेखोरीसाठी पाठीशी घालत आहेत, असा आरोप रहिवाशांनी केला. या वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)