जायकवाडी विद्यार्थी निरोप बातमी
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
मुधलवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना निरोप
जायकवाडी विद्यार्थी निरोप बातमी
मुधलवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना निरोप जायकवाडी : जिल्हा परिषद शाळा मुधलवाडी (ता़ पैठण) येथील सातवीच्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष पांडू लबडे होते़ प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच भाऊ लबडे, अशोक जाधव, अनिल आढाव, लाला जाधव यांची उपस्थिती होती़ यावेळी सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सतरंजी भेट दिली़ त्यानंतर खाऊचे वाटप करण्यात आले. क्रार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. गलाडे, शिक्षक एम.बी.वडनेरे, टी.डी.घुमरे, जे.डी. मुळे, एम. परदेशी यांनी परिश्रम घेतले़ सूत्रसंचालन जे.डी.मुळे यांनी केले. आभार टी.डी.घुमरे यांनी मानले.