Join us

जपानच्या वर्चस्वाला चीन देणार आव्हान

By admin | Updated: March 25, 2015 23:58 IST

आशियात पायाभूत सुविधांसाठी नवीन बँकेमार्फत निधी उपलब्ध करण्याची चीनची योजना असल्याने जपानसमोर आव्हान उभे राहू शकते.

बीजिंग : आशियात पायाभूत सुविधांसाठी नवीन बँकेमार्फत निधी उपलब्ध करण्याची चीनची योजना असल्याने जपानसमोर आव्हान उभे राहू शकते. जपान आशियात देणगी देणारा प्रमुख देश असून काही दशकांपासून त्याचे या एशियन डेव्हलपमेंट बँकेवर नियंत्रणआहे.एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेसाठी आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवायचा चीनचा प्रयत्न आहे. चीनच्या या प्रयत्नांना अमेरिकेने विरोध केला असला तरी गेल्या काही आठवड्यांत मोजक्या युरोपियन देशांनी मात्र सह्या करून चीनला साथ दिली आहे. अन्य अनेक एशियन देश मंडळावर असले तरी जपानचा अपवाद आहे. जपानचे या संदर्भातील फारसे न बोलणे यातून आशियातील पायाभूत विकासासाठी आपला प्रभाव चीनसाठी सोडून द्यायची त्याची तयारी नाही हेच दाखविते. एशियन डेव्हलपमेंट बँकेवर जपान व अमेरिकेचे वर्चस्व असून तिचे मुख्यालय फिलिपाईन्सला आहे. १९६० मध्ये स्थापन झालेल्या या बँकेचे प्रमुखपद तेव्हापासून जपानकडे आहे.