Join us

जम्मू-काश्मीर, ईशान्येची प्री-पेड सेवा कायम

By admin | Updated: March 31, 2015 01:15 IST

सरकारने जम्मू-काश्मीर, आसामसह पूर्वोत्तर राज्यांत ३.३ कोटी प्री- पेड मोबाईल सेवांना दोन वर्षांची मुदतवाढ सोमवारी दिली. या क्षेत्रातील प्री- पेड सेवेच्या परवान्याची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे.

नवी दिल्ली : सरकारने जम्मू-काश्मीर, आसामसह पूर्वोत्तर राज्यांत ३.३ कोटी प्री- पेड मोबाईल सेवांना दोन वर्षांची मुदतवाढ सोमवारी दिली. या क्षेत्रातील प्री- पेड सेवेच्या परवान्याची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे.केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने या विषयावर चर्चा करून ही सेवा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. गृहमंत्रालयाने मंजुरी देताना प्री-पेड सेवा देणाऱ्या कंपन्यांनी सिम कार्ड देताना खूपच काळजी घ्यावी व कागदपत्रांची कटाक्षाने खातरजमा करून घ्यावी, असे स्पष्ट केले. जम्मू-काश्मीरची सीमा पाकिस्तानला खेटून, तर पूर्वाेत्तर राज्यांच्या सीमा चीन, म्यानमार, बांगला देशला लागून आहेत.