Join us

नोकरकपातीनंतरही आयटीच राहणार रोजगारात आघाडीवर

By admin | Updated: May 31, 2017 00:37 IST

अमेरिकेच्या बदललेल्या धोरणांमुळे भारतीय आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली जात असली, तरी देशातील रोजगारनिर्मितीत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अमेरिकेच्या बदललेल्या धोरणांमुळे भारतीय आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली जात असली, तरी देशातील रोजगारनिर्मितीत हेच क्षेत्र प्रमुख राहील, असे एका अहवालात म्हटले आहे. आयटी क्षेत्राला नोकरकपात नवी नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.कोटक इन्स्टिट्यूशन इक्विटीज या संस्थेने यासंदर्भात अभ्यास करून संशोधन टिपण जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, कर्मचारी संख्येत केली जाणारी तडजोड याआधीच्या अशा तडजोडीपेक्षा वेगळी नाही, असे आम्ही मानतो. आयटी क्षेत्र हे नोकरभरतीचे देशातील प्रमुख केंद्र राहील. वार्षिक कामगिरीच्या आढाव्यानंतर आयटी कंपन्या तशाही १ ते ३ टक्के कर्मचाऱ्यांना घरी बसवतात. यंदा हे प्रमाण थोडेसे वाढून २ ते ४ टक्के झाले आहे. आयटी क्षेत्रातील नोकरकपातीमागे अनेक कारणे आहेत. कंपन्यांच्या वृद्धीतील मंदी, स्थानिक कार्यक्रमात झालेली वाढ, कर्मचाऱ्यांचे फेरप्रशिक्षण आणि बाजारांतील बदल यांचा त्यात समावेश आहे.अहवालात म्हटले आहे की, एका बाजूने नोकरकपात सुरू असली, तरी दुसऱ्या बाजूने नोकर भरतीही नेहमीप्रमाणे सुरू आहे. २0१७-१८मध्ये आदल्या वर्षीप्रमाणेच नवीन भरतीचे प्रमाण राहील. कदाचित गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक राहण्याचीही शक्यता आहे. कंपन्यांची महसुली वाढ ८ टक्के राहण्याचा अंदाज आहे.अमेरिकेचा परिणामअमेरिकेत स्थानिक भरती यंदा मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून यंदा नोकरकपातीचे प्रमाण थोडे वाढलेले असेल, असे या अहवालात म्हटले आहे. इंजिनीअरिंग आणि आरअँडटी सेवा क्षेत्रात नोकरभरतीचा वृद्धीदर ७ ते ९ टक्के राहील. देशांतर्गत आयटी आणि बीपीओमध्ये ही वाढ ५ ते ७ टक्के राहील, असेही अहवालात म्हटले आहे.