Join us

रिझर्व्ह बँकेने व्याजदर ठेवले जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2017 00:06 IST

रिझर्व्ह बँकेने बुधवारी पतधोरण आढावा जाहीर करताना धोरणात्मक व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने बुधवारी पतधोरण आढावा जाहीर करताना धोरणात्मक व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले आहेत. धोरणात्मक तरलता प्रमाण (एसएलआर) मात्र 0.५ टक्क्याने कमी केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, रेपोदर सलग चौथ्या आढाव्यात ६.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिव्हर्स रेपोदरही ६ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. पतधोरण समितीतील सहापैकी पाच सदस्यांनी आहे तेच दर कायम ठेवण्यास सहमती दर्शविली. रवींद्र एच. ढोलकिया यांनी त्याला असहमती दर्शविली, असे पटेल यांनी सांगितले.रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक तरलता प्रमाण (एसएलआर) 0.५ टक्क्याने कमी करून २0 टक्के केले आहे. सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतविण्याच्या प्रमाणास एसएलआर म्हटले जाते. यात कपात झाल्यामुळे बँकांच्या हाती कर्जवाटपासाठी जास्त निधी राहील. जीडीपी वृद्धीदर घसरणार सकळ राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धीदराचा अंदाज रिझर्व्ह बँकेने अल्प प्रमाणात कमी करून ७.३ टक्के केला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने वास्तविक सकळ मूल्यवर्धन दरात 0.१ टक्का कपात केली आहे. त्यानुसार जीडीपीच्या वृद्धीदरात १0 आधार अंकांची कपात करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.महागाई अंदाज घटविलारिझर्व्ह बँकेने महागाईविषयीचा अंदाजही घटविला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर २.0 टक्के ते ३.५ टक्के राहील, तसेच दुसऱ्या सहामाहीत ३.५ टक्के ते ४.५ टक्के राहील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. आधी हा दर पहिल्या सहामाहीसाठी ४.५ टक्के, तर दुसऱ्या सहामाहीसाठी ५ टक्के गृहीत धरण्यात आला होता.>मंत्रालयाचा दबाव झुगारलारिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी सांगितले की, व्याजदरात कपात करण्यासाठी सरकारचा दबाव होता. त्यासाठी वित्तमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पतधोरण समितीसोबत १ आणि २ जूनला बैठक ठेवली होती. तथापि, पतधोरण समितीतील सर्व सहा सदस्यांनी एकमुखाने निर्णय घेऊन या बैठकीला नकार दिला तसेच व्याजदर जैसे थे ठेवले.>पतधोरण आढाव्यामुळे सेन्सेक्स, निफ्टी तेजीत मुंबई : पतधोरण आढाव्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८0.७२ अंकांनी वाढून ३१,२७१.२८ अंकांवर बंद झाला. आदल्या सत्रात सेन्सेक्स ११८.९३ अंकांनी घसरला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २६.७५ अंकांनी वाढून ९,६६३.९0 अंकांवर बंद झाला.सेन्सेक्समधील ३0 पैकी २१ कंपन्यांचे समभाग वाढले. ९ कंपन्यांचे समभाग घसरले. वाढ मिळविणाऱ्या कंपन्यांत रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, एमअँडएम, सन फार्मा, एचयूएल, एसबीआय, मारुती, गेल, सिप्ला, हीरो मोटोकॉर्प यांचा समावेश आहे. टीसीएस, विप्रो, इन्फी, टाटा मोटर्स, अदाणी पोर्ट्स यांचे समभाग घसरले.