Join us

व्याजदरांत आॅगस्टमध्येच कपात शक्य

By admin | Updated: May 4, 2017 00:53 IST

रिझर्व्ह बँकेकडून पुढील महिन्यात होणाऱ्या पतधोरण आढाव्यात धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवले जाण्याची शक्यता

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेकडून पुढील महिन्यात होणाऱ्या पतधोरण आढाव्यात धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवले जाण्याची शक्यता आहे. आॅगस्टमधील पतधोरण आढाव्यात मात्र २५ आधार अंकांची कपात केली जाऊ शकते. ‘बँक आॅफ अमेरिका मेरिल लिंच’ने (बोफाएमएल) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली.जागतिक ब्रोकरेज कंपनीने अहवालात म्हटले की, सध्या वृद्धी कमजोर आहे. महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या २ ते ६ टक्क्यांच्या रेंजमध्ये आहे. दर कपातीमुळे रिझर्व्ह बँकेला विदेशी चलन साठ्याला गती देता येऊ शकेल. जीडीपी वृद्धीचा दर सध्या ४.५ ते ५ टक्क्याच्या दरम्यान आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)