Join us

व्याजदर कपात अशक्य - राजन

By admin | Updated: November 7, 2015 02:52 IST

आता आणखी दरकपात केली जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. सरकारची दरांमध्ये कपात करण्याची इच्छा असली तरीही नव्या

नवी दिल्ली : आता आणखी दरकपात केली जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. सरकारची दरांमध्ये कपात करण्याची इच्छा असली तरीही नव्या संधी निर्माण होईपर्यंत हेच व्याजदर योग्य आहेत, असेही राजन यांनी सांगितले.आरबीआयने सद्य परिस्थितीचा पूर्णपणे फायदा घेत व्याजदरात जेवढी शक्य आहे तेवढी कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात तब्बल 0.५0 टक्क्यांची कपात करून आश्चर्याचा धक्का दिला होता.