Join us  

अर्थसंकल्पात वित्तीय शिस्त राखणे महत्त्वाचे! बजेटमध्ये झाले खूपच बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 6:58 AM

एकेकाळी अर्थसंकल्पाला खूपच महत्त्व होते. अनेक महत्त्वाचे करविषयक आणि धोरणविषयक निर्णय हे अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा भाग असायचे.

एकेकाळी अर्थसंकल्पाला खूपच महत्त्व होते. अनेक महत्त्वाचे करविषयक आणि धोरणविषयक निर्णय हे अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा भाग असायचे. रेल्वे अर्थसंकल्प वेगळा असायचा आणि त्यातील घोषणांना राजकीय झालर असायची. काळाच्या ओघात हे सर्व आता कालबाह्य झाले आहे.वाहन व गृहोद्योगातील नरमाईमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. गृहोद्योग क्षेत्रातील मरगळ पूर्वी झालेल्या अवाजवी गुंतवणुकीमुळे आहे. गृहोद्योग क्षेत्रातील अडकलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकारने योजना जाहीर केलीच आहे. तसेच कॉर्पोरेट करात सरसकट कपात सरकारने घोषित केली आहेच. त्याशिवाय, मागणी वाढवण्यासाठी आणखी काहीतरी तात्पुरती उपाययोजना करण्याचा मोह सरकारने टाळला पाहिजे. कारण, वित्तीय शिस्त ठेवणे हे याक्षणी आवश्यक आहे. नाही तर, व्याजदर चढे राहण्याचा दुष्परिणाम समोर ठाकेल.गुंतवणूक, पर्यटन, उद्योग, नवकौशल्य आणि सुसह्य जीवनाच्या दृष्टीने देश आणखी आकर्षक होण्यासाठी प्रयत्न करीत राहायला हवे आणि ते सातत्य या अर्थसंकल्पात दिसायला हवे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक आणि स्थायी स्वरूपाचे बदल घडवणाऱ्या योजना अमलात आणाव्या लागतील. त्यावर सरकारला मेहनत घ्यावी लागेल. त्यातूनच दीर्घकालीन विकासाचा विचार करता पायाभरणी होईल. वैयक्तिक प्राप्तिकर कपातीला मागणी वाढवण्याच्या आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या संदर्भात जोडले जाते.पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने सरकारने उद्योगांसाठी सुलभता आणि जनसामान्यांसाठी आत्मसन्मानाने जगता यावे, यासाठी अनेक प्रकारे प्रत्यक्ष कार्यवाही गेल्या पाच वर्षांत केली आहे. त्यातील सातत्य तसेच टिकून राहावे आणि त्याला गतिमानता यावी, ही या अर्थसंकल्पाकडून नक्की अपेक्षा आहे.- डॉ. अभिजित फडणीस(लेखक हे अर्थशास्त्राचेअभ्यासक आहेत.)उत्पन्न वाढावेनुकतीच सरकारने पायाभूत साधनांची जी एक शृंखला आखलेली आहे, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काही ठोस पावले या अर्थसंकल्पात दिसावी, ही अपेक्षा. करसंकलनातील त्रुटी कमी करून ते वाढवण्याच्या दृष्टीने आणि इतर प्रकारे सरकारी उत्पन्न वाढवण्याचे काय प्रयत्न केले जाणार आहेत, हेदेखील महत्त्वाचे.वाहन उद्योगाला हवी मदतसध्या अर्थव्यवस्था थोडीशी कमी वेगाने वाढत असल्याने यावेळेस सरकारने काहीतरी करावे, या मागणीला जोर चढतो आहे. विशेषत: वाहन आणि गृहोद्योग क्षेत्रातील मरगळ त्याला कारण आहे. खाजगी वाहन क्षेत्रातील मरगळ ही जगभर आणि देशांतर्गत होत असलेल्या काही मूलभूत बदलांमुळे आहे.

टॅग्स :बजेटअर्थसंकल्पकेंद्र सरकारबजेट माहिती