Join us

आयटीतील खर्च १२% वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2017 01:19 IST

केंद्र सरकारने डिजिटल सेवांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अंगीकारल्यामुळे भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात या

नवी दिल्ली : केंद्र सरकारने डिजिटल सेवांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अंगीकारल्यामुळे भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात या वर्षी अंदाजे १२.९ टक्क्यांनी खर्च वाढून तो २,१४,०१२ कोटी रुपये होईल, असे अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी या खर्चाचे प्रमाण १२.३ टक्के होते तर अंदाज मात्र १३.५ टक्क्यांचा होता, असे कोएस एज कन्सल्ंिटगने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. देशात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात खर्चाचे प्रमाण २०१३मध्ये कमी झाले होते, ते नंतर वाढू लागले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची शक्ती वाढत असल्याने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीला जागतिक आव्हाने असतानाही बळ मिळाले आहे, असे कन्सल्टिंगचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल देव सिंह म्हणाले. डिजिटल सेवांसाठी सरकारचा मोठा आग्रह असल्याने २०१८मध्ये ही वाढ आणखी गती घेईल, असे सिंह म्हणाले.