Join us  

...अन् गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IRCTC चा शेअर बाजारात दमदार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 11:38 AM

इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीने (IRCTC) शेअर बाजारात दमदार प्रवेश केला आहे.

मुंबई - इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीने (IRCTC) शेअर बाजारात दमदार प्रवेश केला आहे. आयआरसीटीच्या शेअर्सचे बीएसईवर जवळपास दुप्पट किमतीमध्ये सुमारे ६४४ रुपयांना लिस्टिंग झाले. तसेच काही वेळातच त्यांचे मूल्य ६९१ रुपयांपर्यंत पोहोचले. त्यामुळे आयआरसीटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे काही काळातच दुप्पट झाले आहेत.  आयआरसीटीच्या आयपीओला ज्याप्रकारचा प्रतिसाद मिळाला होता, ते पाहता शेअर बाजारातही त्याची चलती असले, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार आज आयआरसीटीसीच्या शेअरचे दुप्पट किमतीत लिस्टिंग झाल्यावरही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आयआरसीटीच्या शेअरचा प्राइस बँड ३१५ ते ३२० रुपये होता. तसेच कंपनीच्या आयपीओसाठीच्या अर्जाची मुदत  ४ ऑक्टोबर रोजी संपली होती. या आयआरसीटीसीने या आपीओद्वारे ६४५ कोटी रुपये जमवण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. मात्र त्यांना शेअर्ससाठी गरजेपेक्षा ११२ पट अधिक किंमत मिळाली. तसेच त्याचे बाजारमूल्य ११ हजार कोटींच्या पुढे पोहोचले आहे. त्याबरोबरच शेअर बाजाराचा राष्ट्रीय सूचकांक असलेल्या असलेल्या एनएसईवरही या शेअर्सची लिस्टिंग ६२६ रुपयांना झाली होता. 

आयआरसीटीसीने या आपीओद्वारे ६४५ कोटी रुपये जमवण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. मात्र त्यांना शेअर्ससाठी गरजेपेक्षा ११२ पट अधिक किंमत मिळाली होती. मात्र त्यापूर्वीपासूनच आयआरसीटीच्या शेअरची लिस्टिंग चांगल्या किमतीत होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आयआरसीटीच्या आयपीओसाठी ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान अर्ज मागवण्यात आले होते. तसेस त्यासाठी कंपनीने ३१५ ते ३२० रुपये इतकी प्राथमिक किंमत ठेवली होती. 

 

टॅग्स :आयआरसीटीसीभारतीय रेल्वेशेअर बाजार