मुंबई : म्युच्युअल फंडांमधील एकूण गुंतवणुक आॅगस्टमध्ये ९.३३ टक्के इतकी वाढून २५.२० लाख कोटींवर गेली आहे. यात मासिक बचत अर्थात (एसआयपी) खात्यांकडून झालेली गुंतवणूक २.३२ लाख कोटी आहे.असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या माहितीनुसार फंडांच्या एकूण खात्यांमध्ये १.४५ टक्के वाढ झाली. सध्या एकूण खाती ७.६५ कोटी इतकी आहेत. त्यापैकी २.३९ कोटी एसआयपीतील आहेत. या खात्यांमध्ये आॅगस्टमध्ये २.५६ टक्के वाढ झाली आहे.
म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक २५ लाख कोटी रुपयांच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 02:10 IST