Join us

म्युच्युअल फंडांची गुंतवणूक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:37 IST

अर्थसंकल्पात लावण्यात आलेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्याचा (एलटीसीजी) म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यातील गुंतवणुकीत ३.९८ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

मुंबई : अर्थसंकल्पात लावण्यात आलेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्याचा (एलटीसीजी) म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यातील गुंतवणुकीत ३.९८ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (एएमएफआय) अहवालात हा आकडा समोर आला आहे.जानेवारी अखेरीस म्युच्युअल फंडांत जुन्या १८८० व नवीन ३० योजना मिळून, देशभरात २० लाख ५५ हजार ३४९ कोटींची गुंतवणूक झाली. केंद्रीय अर्थसंकल्पात दीर्घकालीन भांडवली नफ्याची मुदत दोन वर्षांवरून एक वर्ष आणण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी जाहीर केला. त्याची अंमलबजावणीही तत्काळ करण्यात आली. याचा भांडवली बाजारात नफा कमविणाºयांना फटका बसणार, हे निश्चित होते.