नवी दिल्ली : इराणशी व्यावसायिक संबंध ठेवणा-या ज्या पाच कंपन्यांची यादी अमेरिकेने केली आहे त्यात सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन आॅईल कॉर्पोरेशन, ओएनजीसी व आॅईल इंडियाचा समावेश आहे. या कंपन्यांना अमेरिकेच्या निर्बंधांना तोंड द्यावे लागू शकते.अमेरिकन सरकारच्या जबाबदारी विभागाने (यूएसजीएओ) ८ नोव्हेंबर २०१३ ते १ डिसेंबर २०१४ दरम्यान इराणच्या ऊर्जा क्षेत्रात व्यावसायिक देवाणघेवाणीत गुंतलेल्या परदेशी कंपन्यांच्या केलेल्या यादीत तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी), भारतीय तेल महामंडळ (आयओसी) आणि आॅईल इंडिया कॉर्पोरेशन (ओआयसी) व चीनची सीएनपीसी व सिनोपेकचा समावेश आहे. आता त्यांच्यावर कारवाई होईल.
इराणमध्ये गुंतवणूक; अमेरिकेला सापडल्या पाच भारतीय कंपन्या
By admin | Updated: March 8, 2015 23:29 IST