Join us

गुंतवणुकीचा वाढला ओघ

By admin | Updated: December 19, 2014 04:04 IST

सरत्या वर्षात देशातील परस्पर निधींमधील गुंतवणूक साडेसतरा टक्क्यांनी वाढली आहे. आता या निधींकडे सुमारे १४ लाख १७ हजार ३३५.५० लाख रुपयांची मालमत्ता आहे.

सर्वसामान्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीचे फायदे मिळवून देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या परस्पर निधींमुळे (म्युच्युअल फंड) सामान्यांचा फायदा होतो की नाही हा वादाचा विषय असला तरी देशातील परस्पर निधींमधील गुंतवणुकीमध्ये वाढ होत आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही. सरत्या वर्षात देशातील परस्पर निधींमधील गुंतवणूक साडेसतरा टक्क्यांनी वाढली आहे. आता या निधींकडे सुमारे १४ लाख १७ हजार ३३५.५० लाख रुपयांची मालमत्ता आहे.भारतीय परस्पर निधींमधील गुंतवणूक वाढत्या प्रमाणात होत आहे. मागील सात महिन्यांपासून शेअर बाजारात असलेल्या तेजीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार पुन्हा एकदा शेअर बाजाराकडे आकर्षित होऊ लागला आहे. ज्या परस्पर निधींमध्ये गुंतवणूक करून फारसा परतावा मिळत नाही, अशांमधून बाहेर पडण्यासही गुंतवणूकदार आता मागे-पुढे बघत नाहीत. ज्यांच्या व्यवस्थापनाबाबत शंका येत असते त्यांना त्याचा फटका बसतो, हेच सरत्या वर्षात दिसून आले आहे.चालू वर्षातील पहिले चार महिने देशातील परस्पर निधी उद्योगाला वाईट गेले असले तरी त्यानंतर मात्र त्यांनाही ‘अच्छे दिन’ दिसू लागले आहेत.मे महिन्यापासून या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. मागील वर्षात देशातील परस्पर निधींमध्ये झालेली गुंतवणूक आणि यावर्षातील गुंतवणूक यामध्ये तुलना केली असता यंदा त्यामध्ये १७.५ टक्क्यांनी वाढ झालेली दिसूनयेते.म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक होत असली तरी गुंतवणुकीच्या प्रकारामध्ये मात्र बदल होतांना दिसत आहे. याआधी इक्विटी योजनांना अधिक प्रतिसाद मिळत होता. आता गुंतवणूकदारांचा ओढा डेट योजनांकडे सुरू झाला आहे.