बंगळुरू : येथे ३ फेब्रुवारीपासून ३ दिवसांची जागतिक गुंतवणूक परिषद होत आहे. या परिषदेत अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येण्याची शक्यता आहे. ‘इन्व्हेस्ट कर्नाटक-२0१६’ या नावाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यात गुंतवणुकीला पोषक वातावरण आहे. परिषदेत अनेक वृद्धी गुंतवणूक योजनांची घोषणा केली जाणार आहे. या आधीच चिन्हित झालेल्या ११६ योजनांत गुंतवणूक होण्याची सरकारला अपेक्षा आहे. गेल्या दोन वर्षांत राज्याने १.३0 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे.
कर्नाटकात उद्यापासून गुंतवणूक परिषद
By admin | Updated: February 2, 2016 03:01 IST