Join us  

फक्त 100 रुपयांत LIC चा 75 हजारांचा विमा कव्हर, जाणून घ्या योजनेबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 3:54 PM

aam aadmi bima yojna : 18 ते 59 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती एलआयसी आम आदमी विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. एलआयसी आम आदमी विमा योजनेचे प्रीमियम 200 रुपये प्रति वर्ष आहे.

ठळक मुद्देएलआयसीच्या आम आदमी पॉलिसीअंतर्गत, विमाधारकाच्या नैसर्गिक मृत्यूवर 30,000 रुपयांचे पॉलिसी कव्हर मिळते. हा लाभ पॉलिसीच्या मुदती दरम्यान मृत्यूवर मिळू शकेल.

 नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर लोक आपले आरोग्य आणि जीवन विमा याबद्दल सावध झाले आहेत. सामान्य लोकांना आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसी देण्यास केंद्र सरकारही सतर्क असल्याचे दिसून येत आहे. सामान्य माणसाच्या कक्षेत अशा लोकांचा समावेश करण्यात आला आहे, जे संघटित क्षेत्रात नोकरी करत नाहीत. अशा लोकांसाठी भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) आम आदमी विमा योजना (Aam Aadmi Bima Yojana) आणली आहे. अॅक्सिडेंटल डेथ (अपघाती मृत्यू) कव्हरेजशिवाय आजीवन पॉलिसी देखील उपलब्ध आहे. (invest lic aam aadmi bima yojna only rs 100 and get 75 thousand rupees benefits know how)

जाणून घ्या याबद्दल...एलआयसीच्या आम आदमी पॉलिसीअंतर्गत, विमाधारकाच्या नैसर्गिक मृत्यूवर 30,000 रुपयांचे पॉलिसी कव्हर मिळते. हा लाभ पॉलिसीच्या मुदती दरम्यान मृत्यूवर मिळू शकेल. याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या व्यक्ती या पॉलिसीचा लाभ घेत असेल आणि त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला 30,000 रुपये मिळतील. याशिवाय, या एलआयसीच्या पॉलिसीमुळे अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यासही त्यांना लाभ मिळू शकेल.

75,000 रुपयांचा मिळेल विमा कव्हरएलआयसी आम आदमी विमा योजनेअंतर्गत अपंगत्व असल्यास पॉलिसीधारकास 37,500 रुपये मिळतील. अपघाती मृत्यू झाल्यानंतर नॉमिनीला या पॉलिसीअंतर्गत 75,000 रुपयांचा विमा कव्हर मिळू शकेल. विमा योजना दोन सामाजिक योजना एकत्र करून बनविली आहे. ही आम आदमी विमा योजना आणि जनश्री विमा योजना आहे. ग्रामीण भागातील गरीब घटकांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी ही योजना सुरू केली गेली. या योजनेंतर्गत, घरात कमावणाऱ्या व्यक्तीला त्याचे कव्हरेज मिळते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रितपणे या योजनेचा प्रीमियम भरतात.

अजून काही मिळतात सुविधाएलआयसीच्या या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाला बर्‍याच सुविधा मिळतात. या पॉलिसीवर अ‍ॅडऑन देखील मिळते. या अॅडऑन अंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत शिकणार्‍या जास्तीत जास्त दोन मुलांना शिष्यवृत्ती देखील मिळते. हे नोडल एजन्सी मॉडेलवर आधारित आहे. नोडल एजन्सींमध्ये पंचायत, स्वयंसेवी संस्था आणि बचत गटांचा समावेश आहे. नोडल एजन्सी जवळच्या पेन्शन आणि ग्रुप स्कीम ऑफिस किंवा कोणत्याही एलआयसी ऑफिसला भेट देऊन या योजनेत सामील होऊ शकतात.

काय आहे याची पात्रता आणि किती भरावा लागेल प्रीमियम?18 ते 59 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती एलआयसी आम आदमी विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. एलआयसी आम आदमी विमा योजनेचे प्रीमियम 200 रुपये प्रति वर्ष आहे. यापैकी 50 टक्के म्हणजेच 100 रुपये राज्य सरकार किंवा केंद्र शासित प्रदेश सरकार देतील. अशा प्रकारे पॉलिसीधारकास वर्षामध्ये फक्त 100 रुपये प्रीमियम भरावा लागतो. याविषयी अधिक माहितीसाठी आपण एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

टॅग्स :एलआयसीव्यवसाय