Join us  

सुरक्षित भविष्यासाठी भरपूर परतावा देणाऱ्या मुदत ठेवींमध्ये (फिक्स डिपॉजिट) गुंतवणूक करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 4:03 PM

भारतीयांनी फिक्स डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करणं काही नवीन नाही आणि अनेकांसाठी हा पर्याय सुरक्षित आणि भरवशाचा जीवनदायी ठरलेला आहे.

गुंतवणूक मुदत ठेवींमध्येच का?

आपण आपल्या निर्वाहाकरिता आहोरात्र झटत असता म्हणून आपली बचत भविष्यात दिवसाकाठी वाढत जावी असे आपणास वाटणे साहजिक आहे. आपल्या कष्टाने मिळवलेल्या पैशांचा आपल्याला सर्वाधिक परतावा मिळावा आणि आपली गुंतवणूक सुरक्षित देखील राहावी यालाच आपण प्राधान्य देणार. गुंतवणुकीचे इतर अनेक पर्याय असले तरीही त्यातल्यात्यात मुदत ठेवीच सुरक्षितता आणि परताव्याच्या दृष्टीने सर्वोत्तम पर्याय आहे. भारतीयांनी फिक्स डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करणं काही नवीन नाही आणि अनेकांसाठी हा पर्याय सुरक्षित आणि भरवशाचा जीवनदायी (saviour) ठरलेला आहे. मुदत ठेव निश्चित उत्पन्न देते जे गुंतवणुकीच्या वेळीच ठरलेले असते, जे इतर गुंतवणुकांच्या बाबतीत शक्य होत नाही. आर्थिक मंदी आली किंवा उलथापालथ झाली तरीही फिक्स डिपॉसीटच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावर काहीही फरक पडणार नसतो. 

ज्यांना आपले वर्तमान व भविष्य सुरक्षित ठेवायचे आहे त्यांच्यासाठी मुदत ठेवच सर्वाधिक पसंतीचा पर्याय असतो. "पैसा वाचवणे म्हणजेच पैसा कमावणे" अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आपल्याला परिचित असतेच. थोडक्यात,  मुदत ठेव एक अशी बचत आहे जी तुमच्यासाठी कमावते देखील. याची मुदतही गुंतवणूक करतांनाच निश्चित झालेली असते. परंतु आणीबाणीचा प्रसंग आलाच आणि आपणास अकस्मात पैशांची गरज पडलीच तर आपण ठेविवर कर्जही मिळवू शकता. त्यामुळे भविष्यातील अंदाजित खर्चांची आपण तरतूद करू शकता.  

सध्याची आर्थव्यवस्था बघता मुदत ठेवीचे महत्त्व 

2018च्या निरुत्साही व उलथापालथीच्या गुंतवणूक वातावरणातून अनुभवी व नवशिके सर्वच प्रकारचे गुंतवणूकदार गेले. स्टॉक मार्केट तर पडलेले होतेच, जे म्युचुअल फंड सर्वोत्तम कामगिरी करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनीही बँकांच्या सामान्य ठेवीवर मिळणाऱ्या किमान व्याजाहून अधिक काही दिले नाही. मुदत ठेवीतील गुंतवणुकीवर मात्र त्याच्याहून जास्त म्हणजे 6.5% ते 7.1% इतके व्याज मिळाले. या वर्षीही मुदत ठेवीदारांना चांगला परतावा मिळेल अशी आशा आहे. मात्र सध्या अर्थव्यवस्थेत होत असलेल्या उतार चढावामुळे गुंतवणूकदार काही महिन्यांहुन अधिक काळाकरिता त्यांच्या पसंतीच्या स्वरूपात पैसे गुंतवू शकत नाही आहेत. खात्रीचा आणि ठराविक परतावा देणारा सर्वोत्तम पर्याय सध्याच्या चढ उताराच्या काळात मुदत ठेविचाच आहे. गुंतवणूकदारांना आम्ही हा सल्ला देऊ इच्छितो की त्याच्याकरिता पी एन बी हौसिंग फायनान्स लिमिटेड सारखा पर्याय सर्वोत्तम असून त्यांनी तो निवडावा ज्यात त्यांची ठेवही सुरक्षित राहील आणि निश्चित परतावा पण मिळेल. 

पी एन बी हौसिंग फायनान्स मुदत ठेवच का? 

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ आम्हाला असलेला हौसिंग फायनान्स मधला वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आणि भारतभरात विस्तारलेले पी एन बी शाखांचे मजबूत जाळे यामुळे पी एन बी हौसिंग फायनान्स मध्ये तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. 

पी एन बी हौसिंग मुदत ठेवींची काही वैशिष्ट्ये खाली देत आहोत.

तुमच्या गुंतवणुकीची सुरक्षितता-  CRISIL ने  ‘CRISIL FAAA/Negative’ असे सर्वाधिक सुरक्षित असल्याचे पतमानांकन देऊन पी एन बी हौसिंग फायनान्स मुदत ठेव सर्वात सुरक्षित असल्याचे अधोरेखित केले आहे. वरील पतमानांकन असलेले गुंतवणूक पर्याय वेळोवेळी द्याव्या लागणाऱ्या आर्थिक सुविधांसाठी सर्वाधिक सुरक्षित मानले जातात.  

ठराविक परतावा – इतर गुंतवणुकांमध्ये परतावा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो, तसे मुदत ठेवींमध्ये न होता तुम्हाला ठरलेला परतावा मिळतोच मिळतो. परतावा ठराविक असून गुंतवणूकदाराचे वय आणि गुंतवणुकीच्या कालावधीनुसार त्याचा दर बदलू शकतो. ज्येष्ठ नागरिकांनी पी एन बी हौसिंग फायनान्स मध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना इतरांपेक्षा 0.25% अधिक व्याज मिळते. 

व्याजदर – व्याजदर आधीच ठरलेले असले तरी विविध योजनांवर त्यांच्या मुदतीनुसार आणि व्याज पुनरावृत्तीनुसार वेगवेगळे व्याज दिले जाते. पी एन बी हौसिंग फायनान्सच्या 12 महिन्यांपासून तर 120 महिन्यांपर्यंतच्या मुदतींवर व्याजदर 8.05% ते 8.45% पर्यंत असे वेगवेगळे असतात. 

रोखीत रूपांतर करण्याचे पर्याय– मुदत ठेव गरजेनुसार हवी तेव्हा मोडून रोख रक्कम घेता येते. मात्र मुदतीच्या आधी मोडायची असल्यास त्यासाठी काही तरतुदी आहेत. पी एन बी मुदत ठेवींची किमान मुदत तीन महिने आहे, त्यानंतरच ठेव मोडता येते. तीन महिने पूर्ण झाल्यावर सहा महिन्यांच्या आत जर ठेव परत घेतली तर त्यावर प्रत्येक गुंतवणूकदारास 4% व्याज मिळेल. मात्र सहा महिन्यानंतर केव्हाही ठेव मोडली तर जो कालावधी पूर्ण झालेला असतो त्यासाठी जे व्याज होते त्याच्या 1% कमी मिळेल. तरीही या तरतुदींनंतरही पी एन बी हौसिंग फायनान्स मधल्या मुदत ठेवी सर्वोत्तम पर्याय आहेतच.  

व्याजाचे हप्ते  – ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा खर्च भागवण्यासाठी त्यांच्या गुंतवलेल्या रकमेवरचे व्याजाचे हप्ते नियमितपणे देण्याची सोय आहे. पी एन बी हौसिंग फायनान्स मध्ये व्याज मूळ रकमेत न जोडता, महिन्याला, तीन महिन्यांनी, चार महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वर्षभरातून एकदा घेण्याची सुविधा आहे.

स्रोतावर कर कपात – पी एन बी हौसिंग फायनान्स मुदत ठेवीच्या व्याजावर टी डी एस म्हणजेच उत्पन्नाच्या स्रोतावरची कर कपात व्याजातून होणाऱ्या उत्पन्नाच्या आय एन आर 5000₹ प्रति वर्ष रकमेच्या वरच होते. 

कर्ज सुविधा  – आकस्मित गरजेसाठी पी एन बी हौसिंग फायनान्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्याला ठेवीच्या 75%रक्कम बँकेच्या देशभरातल्या कोणत्याही शाखेतून मिळू शकते. 

पी एन बी हौसिंग मुदत ठेवी सुरक्षित आणि फायदेशीर 

इतर गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करता, त्यासाठी विशेष अभ्यास आणि संवय असावी लागते, ज्याची मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यकता नसते म्हणून ही गुंतवणूक सहज सोपी असते.  पी एन बी हौसिंग फायनान्स मुदत ठेवींमधल्या विविध पर्यायांची माहिती घ्या आणि आपल्या गुंतवणुकीवर वेळोवेळी खात्रीशीर उत्पन्न मिळवा. 

Click here “To know more about PNB Housing Fixed Deposit”