Join us  

जीएसटी परिषदेतील स्थावर मिळकतीसंबंधी प्रस्तावना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 5:31 AM

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, २४ फेबु्रवारी २०१९ ला झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले आहे ?

- सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, २४ फेबु्रवारी २०१९ ला झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले आहे ?कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, ही बैठक मुख्यत्वे रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधीत होती. रिअल इस्टेट क्षेत्राच्या निवासी विभागास प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या कराचा दर, उपलब्धता, सूट, इत्यादी मध्ये बदल प्रस्तावित केलेले आहे.अर्जुन : कृष्णा, रिअल इस्टेटच्या करदरांमध्ये काय बदल झाला आणि तो कधी पासून लागू होईल ?कृष्ण : अर्जुना, या प्रस्तावा नुसार खालील बदल आहे.१. स्वस्त गृहनिर्माण (अफोर्डेबल हौसींग) प्रोजेक्टवर १ टक्के प्रभावी दराने जीएसटी आकारला जाईल परंतु आयटीसी मिळणार नाही.२. स्वस्त क्षेत्राच्या (अफोर्डेबल हौसींग क्षेत्र) बाहेरील निवासी मालमत्तेवर ५ टक्के दराने जीएसटी आकारला जाईल परंतु आयटीसी मिळणार नाही.३. नवीन दर हे १ एप्रिल २०१९ पासून लागू केले जातील (जर आदी सुचना जारी केली तर).अर्जुन : कृष्णा, स्वस्त गृहनिर्माण (अफोर्डेबल हौसींग) म्हणजे काय ?कृष्ण : अर्जुना, स्वस्त गृहनिर्माण म्हणजे रू ४५ लाखांपर्यत मूल्य असलेले, महानगर नसलेले शहर/गावामध्ये ९० चौ. मिटर पर्यंत कार्पेट एरिया किंवा महानगरांमध्ये ६० चौ. मिटर पर्यंत कार्पेट एरिया असलेले रहिवासी घर होय.अर्जुन : कृष्णा, टिडीआर, जॉर्इंट डेव्हलपमेंट अ?ॅग्रीमेंट, दिर्घकालीन भाडेपट्टी यांची करपात्रता काय असेल?कृष्ण : रहिवासी मालमत्तेवर जर जीएसटी लागू होत असेल तर, टिडीआर, जॉर्इंट डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट, दिर्घकालीन भाडेपट्टी यांच्या सारख्या मध्यस्तांं१ना करातून सुटका असेल.अर्जुन : कृष्णा, या प्रस्ताविकामुळे काय फायदे होतील?कृष्ण : अर्जुना, हे बघ१. घराच्या खरेदीदारास वाजवी भावात घर मिळेल आणि १ टक्के जीएसटीमुळे स्वस्त गृहनिर्माण अधिक आकर्षक होईल.२. बिल्डर्स व घर खरेदी करणाऱ्याला आयटीसी चा फायदा पुढे पास न करणे याची समस्या राहणार नाही.३. या क्षेत्रातील बांधकाम आर्थिक व्यवहाराच्या समस्या कमी होतील.४. बांधकाम व्यावसायीकात प्रोजेक्ट संपल्या नंतर न वापरलेल्या आयटीसीचा खर्च कमी होईल, त्यामूळे चांगले मूल्य मिळेल.५. बांधकाम व्यावसायीकांसाठी कर संरचना आणि कर पालन सोपे होईल.>अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, या प्रस्तावामूळे बांधकाम व्यावसायीकांना कर पालन सोपे होईल. यामुळे बांधकाम व्यावसायींकाच्या कर विषयक कटकटी कमी होऊन कायदा पालन करणे सोपे होईल तसेच ग्राहकांचाही फायदा होईल. त्यामुळे सर्वांसाठी हा निर्णय हिताचा राहील.

टॅग्स :जीएसटी