मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना सुरू करण्याचा सरकारचा बेत आहे, असे केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी सांगितले.२०१५-१६ या हंगामासाठी लांब धाग्याच्या कापसासाठी किमान हमी भाव वाढवून ४,१०० रुपये करण्यात आला आहे, असेही त्यांनी आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या ७४ व्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हित ध्यानात घेऊन किमान हमी वाढविण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल, असे वस्त्रोद्योग सचिव एस.के. पांडा यांनी सांगितले. किमान भावाच्या हमीसाठीडायरेक्ट पेमेंट डिफिशियन्शी सिस्टीमतहत एक पर्थदर्शक योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे.
कापसासाठी थेट लाभ हस्तांतरण योजना आणणार
By admin | Updated: December 8, 2015 01:51 IST