Join us

व्याजदर जैसे थे, रघुराम राजन यांनी सादर केला शेवटचा पतधोरण आढावा

By admin | Updated: August 9, 2016 12:25 IST

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज कारकिर्दीतील शेवटचा पतधोरण आढावा सादर केला असून व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, ९ - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज कारकिर्दीतील शेवटचा पतधोरण आढावा सादर केला असून व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट ६.५० टक्‍क्‍यांवर व रिव्हर्स रेपो रेट ६ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. तसेच सीआरआर ४ टक्के आणि एसएलआर २१.२५ टक्क्यांवर कायम आहे.
 
मॉन्सूनची कामगिरी चांगली असली तरी चलनवाढीचा दर वाढल्याने आज जाहीर होणार्‍या द्वैमासिक पतधोरणात व्याजदर जैसे थेच राहण्याची शक्‍यता आधीपासूनच वर्तवण्यात आली होती. विद्यमान गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या कारकिर्दीतील  हे अखेरचे पतधोरण असून यापुढील पतधोरणे समितीकडून जाहीर केली जाणार आहेत.  पतधोरण समितीवर आपले तीन सदस्य नेमतानाच सरकार रघुराम यांचा वारसदारही या महिन्यात नेमण्यात येणार आहे.
२0२१ पर्यंत महागाईचा दर ४ टक्क्यांवर नियंत्रित करण्याचे धोरण सरकारने गेल्याच आठवड्यात जाहीर केले. पुढील आढावा ४ ऑक्टोबर रोजी सादर होणार असून, त्यापूर्वीच ही समिती सूत्रे होती घेईल.