Join us

वर्षभर तरी व्याजदर ‘जैसे थेच’

By admin | Updated: October 1, 2014 03:03 IST

भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी 2015 र्पयत चलनवाढ 8 टक्क्यांऐवजी 2क्16 र्पयत 6 टक्क्यांवर आणण्याचे भाकीत करत किमान एक वर्ष तरी दरकपात होणार नसल्याचे नवे संकेत दिले आहेत.

मुंबई : अर्थव्यवस्थेत सुधार दिसून आला असला तरी व्याजदरात कोणतीही कपात न करण्याच्या संकेतांवर शिक्कामोर्तब करतानाच भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी 2015 र्पयत चलनवाढ 8 टक्क्यांऐवजी 2क्16 र्पयत 6 टक्क्यांवर आणण्याचे भाकीत करत किमान एक वर्ष तरी दरकपात होणार नसल्याचे नवे संकेत दिले आहेत. 
व्याजदरात कोणताही बदल न करता तो 8 टक्के इतका कायम ठेवला असून रिव्हर्स रेपो रेट 7 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. सीआरआर व एसएलआरमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेणारे पतधोरण डॉ. राजन यांनी मंगळवारी सादर करताना धोरणात्मक अशा कोणत्याही व्याजदरात कपात केली नाही. सर्व दर आहेत तसेच स्थिर ठेवले
आहेत. 
सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर स्टॅटय़ुटरी लिक्विडिटी रेशोमध्ये अर्थात ‘एसएलआर’मध्ये कपात करून काही प्रमाणात दिलासा देतील, अशी जी शक्यता वर्तविली जात होती त्याबाबतही कोणतीही घोषणा न केल्याने काही प्रमाणात बाजाराची निराशा झाली. मात्र, महागाई व चलनवाढ या दोन गोष्टी नियंत्रणात आणण्यास प्राधान्य असल्याचा पुनरुच्चर करत व्याजदर जैसे थे राखले आहेत. पतधोरणाचा पुढील आढावा डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार असून, यावेळीही दरकपात न होता ‘एसएलआर’मध्ये कपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
राजन म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि दरांत काही प्रमाणात दिसून आलेल्या स्थिरतेमुळे महागाई आटोक्यात आणण्यात याचा फायदा होणार आहे. तसेच, यामुळे चालू खात्यातील वित्तीय तूटही आवाक्यात येईल; मात्र अद्यापही मान्सून आणि त्यामुळे कृषी क्षेत्रची वाटचाल व जागतिक पातळीवर राजकीय अस्थैर्याचे जे विषय सुरू आहेत, त्याचा फटका खाद्यान्नाच्या किमती वाढण्याच्या रूपाने उमटण्याची भीतीही आहे. 
परिणामी, दरकपात करून तात्पुरता दिलासा देण्याऐवजी महागाई व चलनवाढ आटोक्यात आणण्यास प्राधान्य देणो अधिक सयुक्तिक ठरेल. याच पाश्र्वभूमीवर 2क्15 करिता चलनवाढ 8 टक्क्यांवर आणण्याचे जे उद्दिष्ट आहे, त्याच्या एक पाऊल पुढे जात 2क्16 र्पयत 6 टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे आणि याकरिता ज्या उपाययोजना सध्या राबविल्या आहेत, त्या कायम राखण्यात येतील.
चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर कपात न करण्याचा फॉम्यरुला आजवर रिझव्र्ह बँकेने कामय राखला आहे. परिणामी, एक वर्ष तरी व्याजदर कपात होणार नाही, असे संकेतच या निमित्ताने राजन यांनी दिल्याचे विश्लेषण अर्थवतरुळात होत आहे. 
(प्रतिनिधी)
 
4अर्थव्यवस्थेत सुधार होतानाच चालू खात्यातील वित्तीय तूट नियंत्रणात येताना दिसत आहे. तसेच, परकीय गुंतवणुकीतही सुधार दिसून येत आहे. या पाश्र्वभूमीवर साडेपाच टक्के विकासदराचे उद्दिष्ट गाठले जाईल; पण घडामोडींचा ट्रेंड असाच सकारात्मक राहिला, तर 2क्15-16 या आर्थिक वर्षात 6.3 टक्के इतका विकासदर गाठणो शक्य होईल, असा आशावाद डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केला. 
4व्याजदर ‘जैसे थे’ राखण्याचे संकेत रिझव्र्ह बँकेकडून मिळतच होते. तसेच, भविष्यातील घडामोडींचा वेध घेऊनच दरकपात आणि एकूणच निर्णय होऊ शकतात, असे आजच्या पतधोरणातून स्पष्ट झाले आहे.
 
अर्थव्यवस्थेत सुधार झाल्याचे संकेत मिळत असले, तरी अद्यापही मान्सूनचा परिणाम आणि जागतिक राजकारणात असलेली अस्थिरता यांचा वेध घ्यावा लागेल. त्यानंतर पुढची दिशा स्पष्ट होईल.
- डॉ. रघुराम राजन,
गव्हर्नर, भारतीय रिझव्र्ह बँक