Join us

2016 र्पयत व्याजदर कपात धूसरच

By admin | Updated: August 7, 2014 00:32 IST

2016 र्पयत व्याजदरात कपात धूसर वाटत असल्याचा अंदाज नोमुरा या अर्थविश्वातील प्रमुख संस्थेने व्यक्त केला आहे.

मुंबई : नुकत्याच मांडलेल्या पतधोरणाच्या माध्यमातून व्याजदरात कपात होईल ही उद्योगजगताची अपेक्षा फोल ठरलेली असतानाच एकूणच अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती आणि आगामी काळातील त्याची वाटचाल याचा आढावा घेतल्यास 2016 र्पयत व्याजदरात कपात धूसर वाटत असल्याचा अंदाज नोमुरा या अर्थविश्वातील प्रमुख संस्थेने व्यक्त केला आहे. 
पतधोरण सादर करताना चलनवाढ आणि अन्नधान्यातील महागाई अद्यापही नियंत्रणात नसल्याची माहिती भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी दिली होती. तसचे, 2क्15 र्पयत चलनवाढीचा दर किमान आठ टक्के तर 2क्16 मध्ये सहा टक्के आणण्याच्या दृष्टीने रिझव्र्ह बँक प्रयत्न करत असल्याचे राजन यांनी स्पष्ट केले होते. या टक्केवारीचा विचार करता व्याजदरात कपात करणो रिझव्र्ह बँकेसाठी फारसे शक्य नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. 
सध्याचे दर किमान आगामी दोन वर्षार्पयत कयम ठेवल्यास शिखर बँकेच्या हाती मोठय़ा प्रमाणावर भांडवल उपलब्धी होईल व याचा वापर त्यांना अर्थव्यवस्थेत 
निधी उपलब्धी करण्यासाठी 
होईल. (प्रतिनिधी)