Join us

नेपाळमधील विमा कंपन्या कामाला

By admin | Updated: May 5, 2015 22:28 IST

नेपाळमध्ये भूकंपामुळे झालेल्या प्रचंड जीवित व वित्तहानीनंतर विमा कंपन्या आता पीडितांच्या दाव्यांचा निपटारा करण्याची तयारी करत आहेत.

काठमांडू : नेपाळमध्ये भूकंपामुळे झालेल्या प्रचंड जीवित व वित्तहानीनंतर विमा कंपन्या आता पीडितांच्या दाव्यांचा निपटारा करण्याची तयारी करत असून यासाठी त्या भारताची सार्वजनिक विमा कंपनी ‘जनरल इन्शुरन्स कंपनी’चीही मदत घेणार आहेत. विमा कंपन्या सध्या दाव्यांपोटी किती रक्कम द्यावी लागू शकते याचा आढावा घेत आहेत. ही रक्कम कोट्यवधी रुपयांत असू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. मात्र, विमा कंपन्यांना या दाव्यापोटीची रक्कम अधिक नसण्याची शक्यता वाटते. कारण, नेपाळच्या २.८ कोटी लोकसंख्येपैकी केवळ पाच टक्के लोकांकडेच जीवन विमा आहे.