Join us

टॅँकरद्वारे होणार पाणीपुरवठा उपायुक्त गुल्हाणे यांचे सभेत निर्देश

By admin | Updated: November 22, 2014 00:42 IST

अकोला: जुने शहरातील प्रभाग क्र.९ सह विविध भागात जलवाहिनीचे जाळे नाही. अशा ठिकाणी टॅँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार बंद केल्याने नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा मुद्दा मनपाच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक मो.फजलू यांनी उपस्थित केला. त्यावर ज्या प्रभागात पाणीटंचाई असेल,अशा भागात टॅँकरद्वारे पुन्हा पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश प्रभारी उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे यांनी दिले.

आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी शहरातील सबमर्सिबल पंपांचे वीज कनेक्शन कापण्याचे आदेश महावितरणला दिले. हातपंप नादुरुस्त असताना, ज्या भागात पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्याच नाहीत, त्या भागातील टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मो.फजलू यांनी आक्षेप नोंदवला. टँकर बंद केल्याने प्रभाग क्र.९ मधील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. पाणीपुरवठ्यासाठी टँकर त्वरित सुरू करण्याची मागणी मो.फजलू यांनी केली असता, प्रभारी उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे यांनी पुन्हा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले.

बॉक्स...
पाणीपुरवठा सुरळीत होईल का?
सर्वसाधारण सभेत उपायुक्तांनी टॅँकर सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच महापौर उज्ज्वला देशमुख यांनी सबमर्सिबल पंप, हातपंप व लिकेजची कामे सुरु करण्यावर भर दिला. परंतु सभागृहात घेण्यात आलेले विविध महत्त्वपूर्ण निर्णय मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांना मान्य होतील का,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अन्यथा पाणीपुरवठ्याचा मुद्दा रखडण्याची चिन्हं आहेत.