Join us

रघुराम राजनऐवजी माजी गव्हर्नरची स्वाक्षरी छापल्याने ३७ कोटींच्या नोटा पडून

By admin | Updated: August 3, 2015 12:46 IST

सरकारी परिपत्रकांमधील प्रिंटीग मिस्टेक या नेहमी चर्चेच्या विषय ठरत असल्या तरी आरबीआयच्या नोटा छापणा-या देवास छपाई कारखान्याची एक प्रिटींग मिस्टेक चांगलीच महागात पडली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३ - सरकारी परिपत्रकांमधील प्रिंटीग मिस्टेक या नेहमी चर्चेच्या विषय ठरत असल्या तरी आरबीआयच्या नोटा छापणा-या देवास छपाई कारखान्याची एक प्रिटींग मिस्टेक चांगलीच महागात पडली आहे. देवास प्रेसने आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांच्याऐवजी माजी गर्व्हनर डी सुब्बाराव यांची स्वाक्षरी छापल्याने तब्बल ३७ कोटी रुपयांच्या नोटा पडून आहेत. 
नियंत्रक व महालेखा परिक्षक अर्थात कॅगच्या अहवालातून देवास प्रेसची ही चुक उघड झाली आहे. नियमानुसार आऱबीआयच्या नोट छापणा-या छपाई कारखान्यांनी २०१४ पासून छापलेल्या नोटांवर रघुराम राजन यांची स्वाक्षरी छापणे आवश्यक होते. राजन हे सप्टेंबर २०१३ मध्ये आरबीआयच्या गर्व्हनरपदी विराजमान झाले असून देवास छपाई कारखान्याला मात्र या नियमाचा विसर पडला. देवास कारखान्यात छापलेल्या २०, १०० व ५०० रुपयांच्या सुमारे २२.६ कोटी नोटांवर राजन यांच्यऐवजी त्यांच्या पूर्वीचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची स्वाक्षरीच छापली. या नोटांची किंमत सुमारे ३७ कोटी रुपये आहे. आरबीआयने चुक निदर्शनास आणून देत नोट स्वीकारण्यास नकार दिल्यावर देवास प्रेसने ही चुक सुधारली. 
सध्या देवास प्रेसने छापलेल्या या नोटा सध्या बँकेत पडून असून आऱबीआये अद्याप या नोटा रद्द ठरवलेल्या नाहीत. या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल असे सांगितले जात असले तरी ही शक्यता कमीच आहे असे कॅगच्या अहवालात म्हटले आहे.