सोयाबीन पिकाची पाहणी
By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST
सोयाबीन पिकाची पाहणी
चान्नी: पातूर तालुका कृषी अधिकारी डी. बी. महल्ले यांनी बुधवारी चान्नी येथील शेतकरी रामकृष्ण येनकर यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी पिकावर चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्याने महल्ले यांनी कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. तसेच हळद पिकाची पाहणी करून त्याबाबत माहिती दिली. त्यांच्यासोबत कृषी सहायक के. के. जाधव, जे. जी. इंगळे, कृषी मित्र ज्ञानेश्वर येनकर, संतोष येनकर, हरिदास इंगळे, देवराव ठेकेदार आदी शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)