Join us

वंृदावन गार्डन्समध्ये किफायत घरे

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST


वाणिज्य बातमी ... १० बाय ३ ...

फोटो आहे.. रॅपमध्ये ...
कॅप्शन : प्रकल्पाची माहिती देताना कीर्ती टिकले, बाजूला हेमंत मालानी.

- बुकिंग आजपासून : दिवाळी-२०१५ मध्ये फ्लॅटचे हस्तांतरण
नागपूर : मंुबईचे फरियाज हॉटेल्स प्रा.लि. आणि नागपुरातील वृंदावन कन्स्ट्रक्शन कंपनी संयुक्तपणे वृंदावन गार्डनस् हा आपला पहिला प्रकल्प सादर करीत आहे. हा प्रकल्प खामला रोड, लंडन स्ट्रीटवर आकाराला येत आहे. लीली, लोटस आणि लॅव्हेंडर अशा तीन उत्तुंग इमारतींचा हा देखणा गृहप्रकल्प तुमच्या घराची सर्व स्वप्ने आणि अपेक्षा पूर्ण करणारा असल्याची माहिती प्रकल्पाच्या प्रमुख कीर्ती टिकले यांनी पत्रपरिषदेत दिली.
हेमंत मलानी हे प्रकल्पाचे कन्सल्टींग आर्किटेक्ट तर भरत चौरे हे बिल्डर आहेत. बांधकाम प्रगतिपथावर असून आरसीसीचे ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. शुक्रवार, ३० जानेवारीपासून नोंदणी सुरू होणार असून दिवाळी-२०१५ पर्यंत फ्लॅट पूर्ण करून हस्तांतरण केले जाईल.
आजच्या काळात हव्या त्या सर्व सुखसोयीयुक्त दोन, तीन आणि चार बेडरूमच्या १०४ अत्याधुनिक अपार्टमेंटची शानदार नगरी आहे. १८ हजार चौरस फूट मोकळी जागा, निव्वळ हिरवळीचे रस्ते, मुलांना खेळायला आणि लँडस्केप गार्डनसाठी जागा सोडली आहे. वृंदावन गार्डनस्मधील हिरवळ आणि शांती तुम्हाला प्रसन्न करेल. तेथील कॉस्मोपॉलिटन वातावरण तुमच्या जीवनात बहार आणेल. वृंदावनचा देखणेपणा, सुरक्षितता, सुविधा आणि सुखद हिरवा परिसर तुम्हाला मोहवून टाकेल यामुळे तुमचे जीवनमान अनेक पटींनी उंचावेल.
वंृदावनच्या अंतर्गत सजावटीत चोखंदळपणे निवडलेल्या वॉल टाईल्स आणि फ्लोअर टाईल्स, सर्वोत्कृष्ट प्रतीचे सॅनिटरीवेअर, नळ-शॉवर्स आणि इलेक्ट्रिक फिटिंग्ज असतील, हिरवेगार लँडस्केप बगिचे, बालकांची खेळण्याची मैदाने, डिश अँटेनाद्वारे केबल टीव्ही आणि सुरक्षेत गेटेड कम्युनिटी आणि प्रत्येक अपार्टमेंटला डोअर फोन, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा आणि सर्व सुविधा असतील.