Join us

पायाभूत सुविधा खर्च २.२ अब्ज डॉलरवर

By admin | Updated: May 5, 2017 00:34 IST

भारतातील आयटी पायाभूत सुविधांचा खर्च २०१७ मध्ये २.२ अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा अंदाज मार्केट रिसर्च फर्म ‘गार्टनर’ने

मुंबई : भारतातील आयटी पायाभूत सुविधांचा खर्च २०१७ मध्ये २.२ अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा अंदाज मार्केट रिसर्च फर्म ‘गार्टनर’ने व्यक्त केला आहे. २०१६ च्या तुलनेत हा खर्च १.५ टक्के अधिक आहे. गार्टनरच्या संशोधन विभागाचे संचालक नवीन मिश्रा म्हणाले की, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून भारतात पायाभूत सुविधा क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. व्यवसायांसाठी डिजिटल वर्कप्लेस हा नवा मंत्र आहे. व्यवसाय आणि आयटी क्षेत्रातील गुंतवणुकदारांनी आपले लक्ष्य आता पायाभूत सुविधांवर केंद्रीत केलेले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)