Join us

इन्फोसिस अमेरिकेत नेमणार २ हजार कर्मचारी

By admin | Updated: November 7, 2014 04:39 IST

देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी ‘इन्फोसिस’चा आगामी काही महिन्यात अमेरिकेत २,१०० अधिक कर्मचारी नियुक्त करण्याचा विचार आहे.

नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी ‘इन्फोसिस’चा आगामी काही महिन्यात अमेरिकेत २,१०० अधिक कर्मचारी नियुक्त करण्याचा विचार आहे. डिजिटल, एनेलिटिक्स आणि क्लाऊड कॉम्प्युटिंगसह सर्वच क्षेत्रात कंपनीची क्षमता वाढेल, यासाठी इन्फोसिसने ही योजना तयार केली आहे.कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, अमेरिकेत नोकरभरती अभियानाने इन्फोसिसच्या व्यापार वृद्धी धोरणास हातभार लागेल आणि त्याची क्षमता वाढेल.नोकर भरती कार्यक्रमासोबतच इन्फोसिसद्वारे ग्राहक संबंध व्यवस्थापन, समुपदेशन, विक्री आणि तंत्रज्ञान पुरवठा यातील विशेषत: वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. नवीन कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांची स्थानिक बाजारासंबंधीची समज, तंत्रज्ञान वैशिष्ट्ये आणि महत्त्वपूर्ण प्रकरणांत पाऊल टाकण्यास मदत होईल. कंपनी चालू आर्थिक वर्षात १,५०० कर्मचारी समुपदेशन, विक्री, पुरवठा यासाठी नियुक्त करील. पुढील १२ महिन्यांत अमेरिकी विद्यापीठातून सुमारे ६०० पदवीधर व पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थी नेमणार आहेत.