Join us

इन्फोसिस गुंतवणूकदारांना देणार १३ हजार कोटी

By admin | Updated: April 14, 2017 05:13 IST

मार्चला संपलेल्या तिमाहीत असमाधानकारक कामगिरी राहिलेल्या इन्फोसिसने समभागांची फेरखरेदी (बायबॅक) आणि वाढीव लाभांश या माध्यमातून भागधारकांना १३ हजार कोटी

बंगळुरू : मार्चला संपलेल्या तिमाहीत असमाधानकारक कामगिरी राहिलेल्या इन्फोसिसने समभागांची फेरखरेदी (बायबॅक) आणि वाढीव लाभांश या माध्यमातून भागधारकांना १३ हजार कोटी रुपये देण्याची योजना तयार केली आहे. पडून असलेल्या मुक्त निधीतून हा खर्च कंपनी भागविणार आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्याच पातळीवर राहिला. बाजाराच्या अपेक्षेपेक्षा ही कामगिरी खूपच कमजोर आहे. त्यामुळे कंपनीचे संस्थापक, माजी कार्यकारी आणि गुंतवणूकदार यांच्याकडून कंपनीवर पडून असलेल्या रोख निधीचा योग्य वापर करण्यासाठी दबाव होता. त्यामुळे कंपनीने समभाग फेरखरेदी व लाभांश वाढविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कंपनीने स्वतंत्र संचालक रवी वेंकटेसन यांची सहायक चेअरमनपदी नेमणूक केली आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत संचालक मंडळात मतभेद झाले. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाचा विस्तार करण्यात आला.