Join us
Daily Top 2Weekly Top 5

इन्फोसिसची सूत्रे सिक्कांकडे

By admin | Updated: June 13, 2014 04:07 IST

जर्मनीतील सॅप कंपनीच्या संचालक मंडळाचे माजी कार्यकारी सदस्य विशाल सिक्का यांची निवड इन्फोसिस कंपनीचे नवे मुख्य अधिकारी म्हणून करण्यात आली

नवी दिल्ली : जर्मनीतील सॅप कंपनीच्या संचालक मंडळाचे माजी कार्यकारी सदस्य विशाल सिक्का यांची निवड इन्फोसिस कंपनीचे नवे मुख्य अधिकारी म्हणून करण्यात आली असून, कंपनीचे अध्यक्ष नारायण मूर्ती व त्यांचा मुलगा रोहन हे पायउतार होणार आहेत.इन्फोसिस ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी असून, सिक्का हे कंपनीच्या संस्थापक सदस्यांपैकी नसणारे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ४७ वर्षीय सिक्का १ आॅगस्ट रोजी डी शिबूलाल यांची जागा घेतील. एस. डी. शिबूलाल हे १९८१ साली इन्फोसिसची स्थापना करणाऱ्या सात अभियंत्यांपैकी एक होते. सेवानिवृत्तीनंतर पुन्हा कंपनीत बोलावण्यात आलेले कंपनीचे मुख्य संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष नारायण मूर्ती व त्यांचा मुलगा रोहन हे पायउतार होतील. नारायण मूर्ती ११ आॅक्टोबरपासून कंपनीचे मानद अध्यक्ष होतील, कार्यकाळ संपण्याआधी चार वर्षे ते पदत्याग करत आहेत, उप कार्यकारी अध्यक्ष एस. गोपालकृष्ण हेही नारायण मूर्ती यांच्याबरोबर १४ जून रोजी पायउतार होत आहेत.आज दिवसभराच्या उलाढालीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिसचे शेअर्स ३२९८ पर्यंत चढून ०.३८ टक्के घसरले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)