नवी दिल्ली : ठोक निर्देशांकावर आधारित महागाई मे महिन्यात आणखी घटून शून्याहून खाली जवळपास ३ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. भारतीय स्टेट बँकेच्या एका संशोधन अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सून सरासरीहून कमी राहिल्याने आणि कच्च्या तेलाच्या भावात वाढीची चिंता असतानाच ठोक महागाईत ही घट होण्याची शक्यता आहे. महागाई कमी होण्याचा हा सलग सहावा महिना आहे. एप्रिलमध्ये ठोक महागाई घटून नवीन नीचांक पातळी शून्याहून खाली २.६५ टक्क्यांवर आली. एसबीआय संशोधन परिपत्रकानुसार, तथापि कमजोर मान्सूनमुळे अन्नधान्य महागाईवर येत्या वर्षभरात विशेष परिणाम होण्याची शक्यता नाही. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि रुपयात घटीमुळे ठोक व किरकोळ भावांवर परिणाम होण्याची कोणतीही संभावना नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ठोक महागाई मेमध्ये जाणार उणे ३ वर!
By admin | Updated: May 18, 2015 03:02 IST