Join us  

Inflation: 8 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचली महागाई, जाणून घ्या, काय म्हणाले RBI चे गव्हर्नर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 7:17 PM

एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर वाढून 7.79 टक्यांवर पोहोचला आहे...

देशातील महागाई सातत्याने वाढताना दिसत आहे. आता एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर वाढून 7.79 टक्यांवर पोहोचला आहे. याच बरोबर, देशातील महागाईही गेल्या आठ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.

वाढत्या महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं - खाद्य पदार्थांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने किरकोळ महागाई वाढली आहे. महत्वाचे म्हणजे, ही महागाई रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा सलग चार महिने वरच्या पातळीवर राहिली आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई यावर्षी मार्च महिन्यात 6.95 टक्के आणि एप्रिल, 2021 मध्ये 4.23 टक्के होती.एप्रिल महिन्यात अन्नधान्य चलनवाढीचा दर 8.38 टक्क्यांवर पोहोचला आहे, तो गोल्या महिन्यात 8.68 टक्के एवढा होता आणि वर्षभरापूर्वी याच महिन्यात 1.96 टक्के होता. सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) महागाई दर 4 टक्क्यांच्या पातळीवर राखण्यास सुचवले आहे. त्यात 2 टक्क्यांची वाढ किंवा घट पाहायला मिळू शकते.

काय म्हणाले RBI गव्हर्नर -जानेवारी, 2022 पासून किरकोळ महागाई सहा टक्क्यांपेक्षा वर कायम आहे. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) बैठक झाली होती. यानंतर गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते, की सध्याच्या परिस्थितीमुळे खाद्य वस्तूंच्या किंमतीत झालेल्या वाढीचा प्रतिकूल परिणाम स्थानिक बाजारातही दिसून येत आहे. याच बरोहर पुढेही महागाईचा दबाव असण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :महागाईव्यवसाय