Join us  

मे महिन्यात महागाईच्या दराने गाठला उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 5:13 AM

मे महिन्यामधील पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीमधील वाढ ३७.६१ टक्के अशी प्रचंड राहिली आहे. एप्रिलमध्ये ही वाढ २०.९४ टक्के होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : इंधन तसेच उत्पादित वस्तुंच्या वाढलेल्या किमतींमुळे मे महिन्यामधील चलनवाढीचा दर १२.९४ टक्के असा विक्रमी राहिला आहे. मागील वर्षी याच महिन्यामध्ये हा दर (-)३.३७ टक्के होता. व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने मे महिन्याची घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीची आकडेवारी जाहीर केली आहे.पेट्रोलियम पदार्थ तसेच विविध उत्पादित वस्तुंच्या मूल्यामध्ये झालेल्या वाढीमुळे महागाई वाढल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. एप्रिल महिन्यामध्ये चलनवाढीचा दर १०.४९ टक्के होता.

मे महिन्यामधील पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीमधील वाढ ३७.६१ टक्के अशी प्रचंड राहिली आहे. एप्रिलमध्ये ही वाढ २०.९४ टक्के होती. उत्पादित वस्तुंच्या मूल्यामधील वाढ ९.०१ टक्क्यांवरून १०.८३ टक्क्यांवर पोहोचली आहे. असे असले तरी अन्नधान्य व खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये घट झाल्याने त्यांचे मूल्य ४.३१ टक्क्यांवर आले आहे. कांदा महागला तरी त्याने रडविले मात्र नाही.

किरकोळ महागाईचा दर ६.३ टक्क्यावरnअन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे  मे महिन्यातील किरकोळ मूल्यावर आधारित महागाईचा दर ६.३ टक्क्यावर पोहोचला आहे. nयाआधीच्या एप्रिल महिन्यामध्ये हा दर अवघा ४.२३ टक्के होता. मे महिन्यात अन्नधान्याच्या किमतीमध्ये ५.०१ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे चलनवाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेने अंदाज केल्यापेक्षा या महिन्यात महागाईचा दर जास्त झाला आहे.

टॅग्स :महागाई