Join us

महागाईचा पारा उतरला

By admin | Updated: March 15, 2016 02:15 IST

डाळी आणि भाजीपाल्यासह खाद्यपदार्थ स्वस्त झाल्याने फेब्रुवारी महिन्यात ठोक मूल्यांक निर्देशांक शून्याखाली (०.९१ टक्के) राहिला. सलग सोळाव्या महिन्यात ठोक महागाईचा पारा शून्याखाली

नवी दिल्ली : डाळी आणि भाजीपाल्यासह खाद्यपदार्थ स्वस्त झाल्याने फेब्रुवारी महिन्यात ठोक मूल्यांक निर्देशांक शून्याखाली (०.९१ टक्के) राहिला. सलग सोळाव्या महिन्यात ठोक महागाईचा पारा शून्याखाली वावरत आहे. महागाई घसरल्याने उत्साह संचारलेल्या भारतीय उद्योग जगताने भारतीय रिझर्व्ह बँकेला धोरणात्मक व्याजदरात घट करण्याचे साकडे घातले आहेत.नोव्हेंबरपासून औद्योगिक उत्पादनात घट होत असल्याने औद्योगिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामुळे महागाईतील घसरण ध्यानात घेऊन रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात घट करावी, अशी मागणी फिक्कीसह भारतीय उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अन्य संघटनांनी केली आहे.काही खाद्यपदार्थ आणि पेट्रोलियम उत्पादने स्वस्त झाल्याने ठोक मूल्यांक निर्देशांक आधारित महागाईचा दर फेब्रुवारीत शून्याखाली राहिला. एका वर्षापूर्वी महागाईचा दर शून्याहून २.१७ टक्के खाली होता. जानेवारीतही हा दर ०.९० टक्केहोता. सरकारी आकडेवारीनुसार खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर फेब्रुवारीत घसरत ३.३५ टक्क्यांवर आला. जानेवारीत हा दर ६.०२ टक्के होता. रिझर्व्ह बँक पाच एप्रिल रोजी पतधोरणाचा आढावा घेणार आहे.चार महिन्यांतील नीचांकडाळींचे भाव भडकलेले असताना अन्य खाद्यपदार्थांचे भाव मात्र अपेक्षाकृत न वाढल्याने फेब्रुवारीत किरकोळ मूल्यांक निर्देशांक आधारित महागाईचा दर ५.१८ टक्के राहिला. हा चार महिन्यांतील नीचांक आहे. यावर्षी जानेवारीत किरकोळ महागाईचा दर ५.६९ टक्के होता.