Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगजगताची निराशा

By admin | Updated: August 4, 2015 23:08 IST

धोरणात्मक दर ‘जैसे थे’ ठेवण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे उद्योग जगतात निराशा पसरली आहे. आर्थिक वृद्धीच्या मार्गातील जोखीम ध्यानात घेऊन

नवी दिल्ली : धोरणात्मक दर ‘जैसे थे’ ठेवण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे उद्योग जगतात निराशा पसरली आहे. आर्थिक वृद्धीच्या मार्गातील जोखीम ध्यानात घेऊन दरकपात करावसाय हवी होती, असे भारतीय उद्योगजगताने म्हटले आहे.मागणीत जोर नसल्याने उद्योग क्षेत्राला फटका सोसावा लागत आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा ओघही मंदावला आहे, तर दुसरीकडे कर्ज उभारणे खर्चिक झाले आहे. या पार्श्वभूमीवर दरकपातीचे धोरण कायम राखले गेले पाहिजे. कर्ज उचलण्याचे प्रमाण कमी झाल्याने बँकांना थकीत कर्जाची चिंता भेडसावत आहे. विशेषत: पायाभूत क्षेत्रातील प्रकल्पांकडे मोठ्या प्रमाणावर कर्ज थकीत आहे. याचा विचार करून व्याजदरात कपात करून गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे जरूरी आहे, असे भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी सांगितले.व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय उद्योगजगतासाठी निराशाजनक आहे. औद्योगिक क्षेत्राच्या वृद्धीत चढ-उतार होत असून मागणीही जेमतेम आहे. अशा स्थितीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, असे मत फिक्कीच्या अध्यक्ष ज्योत्स्ना सुरी यांनी व्यक्त केले.