नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक घडामोडी मंदावल्याचे पुन्हा एकदा सूचित झाले असून, जानेवारीत औद्योगिक उत्पादन १.५ टक्क्यांनी घटले. औद्योगिक उत्पादन घटणारा हा सलग तिसरा महिना आहे. नोव्हेंबरमध्ये ३.४ टक्क्यांनी आणि डिसेंबरमध्ये १.२ टक्क्यांनी औद्योगिक उत्पादनात घट झाली होती. उत्पादन क्षेत्रातील खराब कामगिरीमुळे असे झाल्याचे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे.
औद्योगिक उत्पादन १.५ टक्क्यांनी घटले
By admin | Updated: March 12, 2016 03:30 IST