रबात : भारत आणि मोरक्को यांच्या संयुक्त चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे (आयएमसीसीआय) येथे थाटात उद्घाटन करण्यात आले. दोन्ही देशांतील आर्थिक विकासाला गती देण्यास ही संस्था सुरू करण्यात आली.मोरक्कोच्या दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि मोरक्कोचे पंतप्रधान अब्देलीला बेन्किरो यांनी एका समारंभात चेंबरचे उद्घाटन केले. हमीद अन्सारी यांनी याप्रसंगी सांगितले की, या विषयाकडे आम्ही फारसे लक्ष दिले नव्हते. त्यामुळे चेंबर आॅफ कॉमर्स स्थापन होऊ शकला नव्हता. आता ही संस्था अस्तित्वात आली आहे, हे चांगले झाले. जग बदलत आहे. जागतिकीकरण सर्वत्र वेगाने पसरत आहे. आयएमसीसीआयसारख्या संस्थांची आम्हाला गरज आहे. ही संस्था म्हणजे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध वाढत असल्याची उदाहरणे आहेत. या संस्थेने दोन्ही देशांच्या गरजा लक्षात घेऊन काम करावे.
भारत-मोरक्को चेंबर आॅफ कॉमर्स
By admin | Updated: June 2, 2016 02:46 IST