Join us  

विदेशी कंपन्यांमधील अप्रत्यक्ष गुंतवणूक प्राप्तिकरच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 12:48 AM

विदेशी कंपन्यांत समभाग आणि मालमत्ता असणाऱ्या, तसेच विदेशी ट्रस्टचे लाभधारक असलेल्या ज्या भारतीयांनी आपल्या अप्रत्यक्ष गुंतवणुकीची (इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट) माहिती लपविली असेल, त्यांच्यावर आता प्राप्तिकर विभागाची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता आहे.

मुंबई : विदेशी कंपन्यांत समभाग आणि मालमत्ता असणाऱ्या, तसेच विदेशी ट्रस्टचे लाभधारक असलेल्या ज्या भारतीयांनी आपल्या अप्रत्यक्ष गुंतवणुकीची (इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट) माहिती लपविली असेल, त्यांच्यावर आता प्राप्तिकर विभागाची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता आहे.अप्रत्यक्ष गुंतवणूक ही पुढील पातळीवरील गुंतवणूक आहे. भारतीय नागरिकाचे भागभांडवल असलेल्या कंपनीने विदेशातील कंपनीच्या समभागांत गुंतवणूक केलेली असल्यास ही अप्रत्यक्ष गुंतवणूक ठरते. समजा दुबईतील संस्थेमध्ये एका भारतीयाची १५ टक्के गुंतवणूक आहे आणि अ संस्थेने अमेरिकेच्या ब, क आणि ड या तीन कंपन्यांत गुंतवणूक केली आहे, तर नियमानुसार ब, क आणि ड या कंपन्यांतील ही गुंतवणूक अप्रत्यक्ष गुंतवणूक ठरते. प्राप्तिकर कायद्यानुसार, ही गुंतवणूक संबंधित व्यक्तीने ‘अ’ कंपनीमधील गुंतवणुकीसोबत दाखविणे आवश्यक आहे. देशातील काही बड्या व्यक्तींनी अशा प्रकारची अप्रत्यक्ष गुंतवणूक उघड केलेली नाही. त्यांच्याकडून प्राप्तिकर विभाग स्पष्टीकरण मागणार आहे.

टॅग्स :गुंतवणूक