Join us

भारत भालके प्रतिक्रिया

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

अडीच टीएमसीसाठी साडेबावीस टीएमसी पाणी वाया

अडीच टीएमसीसाठी साडेबावीस टीएमसी पाणी वाया
सोलापूरला वर्षभर फक्त अडीच टीएमसी पाणी लागते. नदीतून पाणी सोडण्यात येत असल्याने 22.5 टीएमसी पाणी वाया जात आहे. लातूर, उस्मानाबादला रेल्वेने पाणी नेण्याचा विचार होत असेल तर सोलापूरसाठी का उपाययोजना होत नाही. सोलापूरच्या नावाने नदीत पाणी सोडल्यानंतर वीज खंडित केली जाते. यामुळे नदीत पाणी असूनही शेतकरी व जनावरांचे हाल होत आहेत. सोलापूरला सोडण्यात येणार्‍या पाण्याचे बचत करून भीमा, सीना व माण नदीत पाणी सोडल्यास शेतकर्‍यांना फायदा होईल, असा मुद्दा आ. भारत भालके यांनी मांडला. वरच्या धरणातून उजनीत पाणी सोडण्याबाबत आज सुनावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.