Join us

भारताची प्रगती चांगली : जेटली

By admin | Updated: January 25, 2016 02:07 IST

वैश्विक अर्थव्यवस्था धोक्यात असतानाही भारतात मात्र आशेचा किरण दिसत आहे. आपण खासगी क्षेत्राकडे लक्ष देत गुंतवणुकीवर भर दिला पाहिजे

दाओस : वैश्विक अर्थव्यवस्था धोक्यात असतानाही भारतात मात्र आशेचा किरण दिसत आहे. आपण खासगी क्षेत्राकडे लक्ष देत गुंतवणुकीवर भर दिला पाहिजे तसेच आपल्या अर्थव्यवस्थेची विश्वासार्हता वाढविली पाहिजे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. ते म्हणाले की, सात टक्के विकासदर कायम राखणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. परिणामी, गुंतवणूकदार भारतात येत आहेत व भारताकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत.जागतिक अर्थव्यवस्था चिंता करण्याजोग्या स्थितीत आहे. पूर्वी कच्चे तेल महाग झाले याची चिंता होती आता तेलाचे भाव पडल्याची चिंता करावी लागत आहे.