Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा वृद्धी दर ७.३ टक्क्यांवर

By admin | Updated: May 30, 2015 00:05 IST

बांधकाम आणि सेवा क्षेत्रात उलाढालींना वेग आल्यामुळे २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ७.३ टक्के राहिला.

नवी दिल्ली : बांधकाम आणि सेवा क्षेत्रात उलाढालींना वेग आल्यामुळे २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ७.३ टक्के राहिला. केंद्रीय सांख्यिकी संघटनेने (सीएसओ) शुक्रवारी ही माहिती दिली. याआधी सीएसओने आर्थिक वृद्धीचा दर ७.४ टक्क्यांचा अंदाज व्यक्त केला होता. २०१३-२०१४ मध्ये आर्थिक विकास दर ६.९ टक्के राहिला. सीएसओच्या नव्या मालिकेनुसार ही आकडेवारी असून तिचे आधारवर्ष २०११-२०१२ आहे. आर्थिक वर्ष २०१४-२०१५ च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) अर्थव्यवस्थेची वाढ ७.५ टक्के झाली.