Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा वृद्धीदर ७.५% राहण्याचा अंदाज

By admin | Updated: February 19, 2016 03:06 IST

चीनमधील मंदीचा फारसा परिणाम भारतातील बाजारावर होणार नाही. त्यामुळे २०१६-१७ मध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर ७.५ टक्के राहण्याचा अंदाज ‘मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस’ने वर्तविला आहे.

नवी दिल्ली : चीनमधील मंदीचा फारसा परिणाम भारतातील बाजारावर होणार नाही. त्यामुळे २०१६-१७ मध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर ७.५ टक्के राहण्याचा अंदाज ‘मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस’ने वर्तविला आहे.‘मूडीज’ने अहवालात म्हटले आहे की, जागतिक वृद्धीदरात तेजी येण्याची शक्यता नाही. चीनमधील मंदी, मागणीपेक्षा पुरवठा जास्त आणि वस्तूंच्या घटलेल्या किमती, काही देशातील ढासळती वित्तीय स्थिती यामुळे तेजीची शक्यता नाही.या बाह्य घटकांचा भारताच्या आर्थिक स्थितीवर फार मोठा परिणाम होणार नाही बँकांचे थकीत कर्ज, विशाल कॉर्पोरेट कर्ज याबाबी परिणाम करू शकतात.